पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मुलांचे ग्रंथ संग्रहालय …
Come and Discover the Joy of Learning, Creativity & Innovation @
मुले टी.व्ही. पाहतात ही जुनी तक्रार आहे. अशावेळी पालकांनी मुलांना मार्गदर्शन केले पाहिज. मुलांना उत्स्फूर्त होऊ द्या, त्यांना कुणाची नक्कल करायला लावू नका. चेहरा हसरा ठेवा, दुसर्याचे नीट ऐका, नीट बोला, चुका कबूल करा आणि आयुष्याचे प्लॅनिंग करा ही पंचसूत्री मुलांनी आत्मसात करायला हवी.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी एकही चांगले ग्रंथालय / वाचनालय नव्हते. जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालयाच्या रुपाने पुस्तकप्रेमी रसिकांसाठी एक अमुल्य ठेवा उपलब्ध करुन दिला व वाचन संस्कृती जोपसण्यासाठी एक पाउल उचलले. ग्रंथालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जयसिंगपूर शहरासह इचलकरंजी व सांगली येथून सभासद या सेवेचा लाभ घेत आहेत. अत्यल्प मासिक वर्गणी, दर महिन्याला नविन पुस्तकांची खरेदी, मुलांची मासिके / साप्ताहिके / वर्तमान पत्रे व तसेच लहान मुलांमध्ये टी. व्ही. / काँम्प्युटर / व्हि. डी. ओ. गेम्स ऐवजी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी भरपूर प्रमाणात पुस्तके मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार पुस्तके व मासिके उपलब्ध असलेले समृद्ध ग्रंथालय जयसिंगपूर मधील नागरीकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
अभ्यासाबरोबर वाचनाची आवड जोपासल्यामुळे आपल्या ज्ञानात भर तर पडतेच पण आपले व्यक्तीमत्वही सुसंस्कारित होते. लहान मुलांना त्यांच्या वर वाचनाचे संस्कार करण्या साठी आवश्यक ते वातावरण आपण दिले के मुले आपोआपच त्याकडे आकर्षित होतात. त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. वाचनाचे आवड निर्माण झाल्यावर त्याचे नीट आकलन होण्या साठी योग्य रीतीने उच्चार आणि त्याचा अर्थ बोध होईल. असे वाचन करणेही महत्वाचे आहे, असे उद्गार विदर्भातील प्रसिद्ध कवी अनिल धुदाट (पाटील) यांनी मुलांचे ग्रंथ संग्रहालय, जयसिंगपूर येथे भेटी प्रसंगी काढले.
'स्वर्गा पेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्गा निर्माण होतो' अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी ग्रंथाचे महत्व विषद केले आहे. 'वाचाल तर वाचाल' असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य असले तरी काळाच्या ओघात पुस्तकाचे महत्व वाटत नसले तरीही वाचन हाच मानवाच्या प्रगतीचा पाया आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचायला कुणालाही वेळ नाही असे आपणास बहुतांश लोकाकडून ऐकायला मिळते. कारण आज पुस्तकाची जागा संगणकाने घेतली आहे. तरी पण या संगणकाच्या युगात आजही करोडो रुपयाची पुस्तके खरेदी केली जातात. यावरून पुस्तकांचे आकर्षण कायम आहे, असे म्हणायला हरकत नाही. ग्रामीण भागात, पोथ्याचे पारायण ही प्रथा धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पार पडली जाते. परंतु पोथी वाचनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या श्रोत्यास पोथी व्यतिरिक्त इतर ग्रंथ वाचून दाखवल्यास किवा वाचनास दिल्यास तर तो केवळ श्रोता न राहता वाचक होण्यास वेळ लागणार नाही.
ग्रंथालय चळवळीत जी स्वार्थ साधणारी माणसे असतील त्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मनोभावे काम करणारे जे कर्मचारी आहेत, त्यांना योग्य वेतनश्रेणी दिली पाहिजे. सरकार अनुदान वितरित करताना वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल पाहत असतेच. कागदांवरील ग्रंथालयांची मान्यता रद्द व्हावी. चांगल्या ग्रंथालयांना कोणत्याही पडताळणीची भीती असत नाही. पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ कायद्याचा बागुलबुवा पुढे उभा करून सार्वजनिक ग्रंथालयांना चक्रव्यूहात ढकलू नये. खेडोपाडी ग्रंथालयांना पुरेशी जागा मिळत नाही. ग्रंथालये देवालयात, चावडीत किंवा अन्य योग्य ठिकाणात असली, तरीही लोक वाचनाचा लाभ घेतात. वाचनसंस्कृती वाढते आहे. ग्रंथालये गावाची सांस्कृतिक केंद्रे होत आहेत. यादृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ग्रंथालयातील सर्व व्यवहार प्रामाणिकपणाचे आणि पारदर्शक असावेत. सातारा जिल्ह्यामध्ये 435 ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये "ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसित होत आहे. महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिक वेगाने विकसित झाली पाहिजे. या चळवळीच्या संवर्धनासाठी "पडताळणी' ही एक सुवर्णसंधी आहे, असे वातावरण निर्माण व्हावे.
मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. ती ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्याने वाचन संस्कृती जोपासायला हवी. यासाठी प्रयत्न व परिश्रमाची तयारी ठेवायला हवी. नव्या पिढीवर संस्कार नाहीत ती वाया गेलीय भरकटल्यासारखी वागतात, जुन्याना जुमानत नाहीत असे आरोप केले जातात.पण मुळात आपण त्याना संस्कार देतो का? मुळात सध्या आपण आपल्या मुलांना शिक्षणच जर मराठीतून देत नसेल तर वाचन संस्कृती रुळणार कशी? मग त्यांना उल्का, क्रौंचवध माहित तरी असतील का ? आणि मग प्रगल्भ विचार मिळणार कुठून?
शाळकरी मुलांना जर अगदी बोध्काथांपासून संतवाणी पर्यंत शक्य तितक्या गोष्टी animation माध्यमाने, रंगेबिरंगी मोठ्या fonts च्या पुस्तकांमार्फात पुरवलीत...तर त्याने मुलं साहित्याकडे निश्चित खेचली जातील..... म्हणजे "हे काही छान आहे बाबा" असा त्यांच्या मनात येऊन ते आपल्या पुस्तकांकडे वळतील..... त्या नंतर का होईना "पुस्तक आपली गुरु ठरू शकतात हे त्यांना जाणवेल. आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांनीच घडत असतं, शब्द दुय्यम असतात विचार मात्र चिरन्तन टिकतात त्यामुळे विचार करताना काळजी घेतली पाहिजे. कधी कसा विचार करायचा हे जर चांगल्याने अवगत करून घ्यायचे असेल तर चांगले वाचले पाहिजे किमान या बाबतीत तरी आपण मराठीजन भाग्यवान आहोत की आपल्या कडे चांगले साहित्यिक,विचारवंत आणि संत होऊन गेले ज्यांनी आपल्या लिखाणातून भरभरून दिले आहे. अशा सुवर्णसंधीचा आपण शुभलाभ घेतला पाहिजे. आणि ते नव्या पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे ...
वाचनाच्या या व्यसनामुळे असेल नंतरच्या आयुष्यात अनेक व्यसनांपासुन मी शेकडो मैल दूर राहिलो.कारण माझा गुरु पुस्तकं होती. नामवंत साहित्यीकानी माझं सम्गोपन केलं मला घडवलं त्याच्या साहित्यातून. यशाने हुरळून जाउ नये आणि अपयशाने खचू नये हा विचार माझ्या बालमनावर रुजला...तसेच अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे हा देखील. म्हणुन कुठलंच काम पूर्ण रिसर्च शिवाय. १०० टक्के तयारी शिवाय केलं नाही. नव्या पिढीत जिद्द आहे. पण त्याना झटपट यश हवं असंतं अर्धवट तयारीने का होईना लवकर प्रवाहात ऊडी मारायची वृत्ती असते ती त्याना तळाशी नेते.त्याही परिस्थीतीत विचारांची संस्कारांची साथ असेल तर ती वर येतात नाही तर व्यसनांच्या आहारी जातात.या करता त्याच्या पर्यंत कोवळ्या वयातच उत्तम साहित्य पोचायला हवं. साहित्य म्हणजे शब्द केवळ नाहित तर उत्त्म विचारांची जोड असलेलं शब्दभंडार. त्यातुनच त्याना चांगलं काय वाईट हे ओळखणारे संस्कार आपोआपच मिळतील.त्यांच्या पंखात बळ आहेच त्याला विचारांची दिशा मिळेल.आणि क्षितिजापार झेपावायचं त्यांचं स्वप्न ही सत्यात येईल.
No comments:
Post a Comment